मागीलवर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोदी एक्सप्रेस दादरहून कोकणात जाण्यासाठी रवाना होईल. २९ ऑगस्टला सकाळी १० वाजता दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरून मोदी एक्सप्रेस रवाना होईल. दादर ते कणकवलीपर्यंत जाणाऱ्या मोदी एक्सप्रेसचा वैभववाडी इथेही थांबा असेल अशी माहिती आमदार नितेश राणेंनी दिली